स्टोरी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहतुकीस बंद!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. २७ ऑगस्टपासून या निर्णयाची कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा; म्हणजेच रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्तता व्हावी, यासाठी सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे, त्यामुळे जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव संपेपर्यंत हा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद असेल. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या अवजड वाहनचालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा.

 

या महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश मंत्री चव्हाण यांनी दिले आहेत.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना कराव्यात! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार….

news

महाराष्ट्र शासन भाषा मंत्रालयाच्या वतीने २०२६ बाल मराठी साहित्य संमेलन संपन्न.

प्रसाद परब

कांदळवन आणि सागरी जैव विविधता यांच्‍या उच्‍च शिक्षणासाठी राज्‍यशासनाकडून मिळणार शिष्‍यवृत्ती!

news

Leave a Comment