क्राईम

रोहा येथील शाळेत गुप्‍तधनासाठी अघोरी विधी करणार्‍या ७ जणांना अटक !

Spread the love

रायगड: येथील धामणसई स्‍मशानभूमीत आणि शाळेत गुप्‍तधनासाठी काळी बाहुली, लिंबू, सुई, हळद-कुंकू, फुलांची विचित्र मांडणी करून मांत्रिकांनी गळ्‍यात कवट्यांची माळ घालून ‘ओम फट् स्‍वाहा’ मंत्रजप केला. या प्रकरणी शाळा आणि स्‍मशान येथे जादूटोणा करणार्‍या टोळीतील ७ जणांना पोलिसांनी जादूटोणा कायद्यांतर्गत अटक केली असून २ सूत्रधार पसार झाले आहेत. संतोष पालांडे, प्रदीप पवार, प्रवीण खांबल, सचिन देसाई, दीपक कदम, मिलिंद साळवी, राजेंद्र तेलंगे अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत.

धामणसई स्‍मशानभूमीत आणि शाळेत काही व्‍यक्‍ती तंत्र-मंत्र उच्‍चारत अघोरी विधी करत असल्‍याचे ग्रामस्‍थांना समजले. चौकशी केल्‍यावर त्‍यांनी दिशाभूल करणारी उत्तरे दिली. ग्रामस्‍थांनी पोलिसांना कळवले. पोलीस तेथे पोचण्‍यापूर्वी गळ्‍यात कवट्यांची माळ घातलेले दोघे जण पळून गेले.


Spread the love

Related posts

मयत सौ.दीक्षा चौकेकर प्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्याच्या वतीने त्वरित योग्य त्या कार्यवाहीची अंमलबजावणी व्हावी…! अमित वेंगुर्लेकर 

news

अवैद्यरीत्या पोपट व शेकरु यांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या विरुद्ध सावंतवाडी वन विभागाची कारवाई…..

news

मुलांमध्ये अल्कोहोल सेवनापेक्षाही अमली पदार्थांचे व्यसन करण्याचे प्रमाण अधिक !

news

Leave a Comment