स्टोरी

ए. एस. आय. पोलीस जगदीश दूधवाडकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: काल रात्री सातच्या सुमारास सावंतवाडी आरोग्य भुवनच्या मागे एक वृद्ध व्यक्ती आजारी अवस्थेत आढळून आला याची कल्पना सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना मिळताच रवी जाधव व अशोक पेडणेकर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी लगेचच सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला असता घटनास्थळी ए एस आय पोलीस अधिकारी जगदीश दूधवाडकर दाखल झाले. सदर वृद्धाची अवस्था फार गंभीर होती सारख्या उलट्या करत होता तापानेही फडफडत होता व कपड्यांमध्ये पूर्णपणे घाण करून ठेवल्यामुळे दुर्गंधी पसरली होती परंतु याची तमा न वळता खाकी वर्दीतील त्या पोलीस अधिकाऱ्याने देवदुताचे दर्शन घडवले व सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांबरोबर सदर घाणीमध्ये लडबडलेल्या त्या वृद्धाला आंघोळ घालण्यास मदत केली.

आंघोळ घालून स्वच्छ केल्यानंतर सामाजिक बांधिलकीचे अशोक पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते अखिलेश कोरगावकर यांनी त्या वृद्धासाठी नवीन कपडे आणून घातले. तर शहरातील माजी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी विनामूल्य ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली व त्या ॲम्बुलन्सने सदर वृद्धरुग्णाला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले व त्यानंतर त्या वृद्धाच्या नातविकांचा शोध घेऊन त्या वृद्धाला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळा कुडतरकर व आरोग्य भवन चे मालक यांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Related posts

गुजरातला धडकल्यानंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले!

news

राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या रायगड जिल्ह्यातील भोगावती पुलाच्या निकृष्ट कामाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार….!

news

कोकण रेल्वे मार्गावरील २४ तासानंतर हि पूर्वपदावर नाहीच.

news

Leave a Comment