स्टोरी

टायटॅनिक च्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या एका पाणबुडीचा भयंकर स्फोट!

Spread the love

२३ जून वार्ता: रविवारी टायटॅनिक च्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या एका पाणबुडीचा “भयंकर स्फोट ” झाला. या स्फ़ोटात जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाला असे यूएस कोस्ट गार्ड रिअर ऍडमी जॉन मॅगर यांनी काल गुरुवारी सांगितले. ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या एका छोट्या पाणबुडीमधून पाच अब्जाधीश टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेले होते. रविवारी टायटन या सबमरीन मधून हे अटलांटिक महासागराच्या तळाशी जात होते. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे या पाणबुडीचा आणि त्यासह त्यातील सर्वांचा संपर्क तुटला. यानंतर बेपत्ता झालेल्या या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला होता. दुर्दैवाने आज ओशियन गेटने या पाणबुडी मधले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत असे आपल्या अधिकृत स्टेटमेंट मध्ये जाहीर केले आहे.

बेपत्ता झालेल्या पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग (वय ५८) यांच्यासह पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा सुलेमान (वय १९) हे देखील होते.


Spread the love

Related posts

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे अदानी समुहाच्या ६ आस्थापनांचे ४५ सहस्र समभाग (शेअर्स)!

news

मसुरे गावठणवाडी येथे २० मे रोजी दशावतार नाट्यप्रयोग!

news

मसुरेच्या श्री दत्त मंदिराचा तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ अंतर्गत होणार विकास!

news

Leave a Comment