राजकारण

विजय वडेट्टीवार यांच्‍या रुपाने एक सक्षम विरोधी पक्ष नेता मिळाला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

३ ऑगस्ट वार्ता: काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी निवड होणार असे आम्‍ही ऐकत होतो. याबाबतची त्‍यांची चिठ्ठी झाली आहे. त्‍यावर सही झाली आहे. ती चिठ्ठी दिल्‍लीवरुन निघालीय, असेही आम्‍ही ऐकलं. मात्र त्‍यांची चिठ्ठी नेमकी कुठे अडते हे माहिती नाही, अशा शब्‍दांमध्‍ये उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत टोलेबाजी केली.

२०१९ मध्‍ये विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसने निवड केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार स्‍थापन दिल्‍यवर त्‍यांना त्‍यांच्‍या उंचीचे खाते मिळाले नाही. ही सल त्‍यांच्‍या मनात राहिल. मागे ज्‍यांच्‍यावर अन्‍याय झाला त्‍यांना आम्‍ही न्‍याय दिला. ते आज आमच्‍यासाेबत साेबत आहेत. शेवटी ज्‍याला कुठेच न्‍याय मिळत नाही त्‍याला आम्‍हाला न्‍याय द्यावा लागतो, असाही टाेला यावेळी फडणवीसांनी लगावला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, २०१९ मध्‍ये विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसने निवड केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार स्‍थापन दिल्‍यवर त्‍यांना त्‍यांच्‍या उंचीचे खाते मिळाले नाही. ही सल त्‍यांच्‍या मनात राहिल. मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळ त्‍यांनी राज्‍याचे राजकारण जवळून पाहिले आहे. त्‍यांनी विदर्भात शिवसेना वाढविण्‍यास विशेष परीश्रम घेतले. आता वडेट्टीवार यांच्या अनुभवाचा सभागृहास फायदा होणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार यांच्‍या रुपाने एक सक्षम विरोधी पक्ष नेता मिळाला आहे. सरकारच्‍या चुका दाखवून देण्‍याचे काम विरोधी पक्ष नेतेपदाचे असते. आता विरोधी पक्ष नेतेपदासारख्‍या महत्त्‍वाच्‍या पदाची जबाबदारी त्‍यांच्‍याकडे आली आहे. ते या पदाचा मान ते वाढवतील, असा विश्‍वासही फडणवीस यांनी व्‍यक्‍त केला.


Spread the love

Related posts

ठाकरे गटाकडे असलेले खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार! खासदार कृपाल तुमाने यांनी केला गौप्यस्फोट

news

चित्रा वाघ यांची नाव न घेता राऊतांवर टिका!

news

शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका…..

news

Leave a Comment