क्राईम

ब्रेकिंग न्यूज: मुंबईत धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार! चौघांचा मृत्यू….

Spread the love

ट्रेन थांबवून डबा सील; आरोपीला अटक….

मुंबई: धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ४ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका रेल्वे पोलीस जवानानेच हा गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये चेतन सिंह नावाच्या आरपीएफ कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. या जवानाने आरपीएफच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाबरोबरच ३ प्रवाशांवर गोळीबार केला. एका सीआरपीएफ जवानानेच हा गोळीबार केला आहे. आरोपीला अटक करुन भाईंदर पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलं आहे. आज म्हणजेच ३१ जुलै रोजी पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना धावत्या ट्रेनमध्ये घडली. या गोळीबारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून या हल्ल्यात काही प्रवासी जखमी झाले.

पालघर जिल्ह्याच्या हद्दीत घडला प्रकारपालघर ते विरार रेल्वे स्थानकांदरम्यान एक्स्प्रेसमध्ये या आरपीएफ जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गोळीबार केला. यावेळेस तेथे असलेल्या ३ प्रवाशांनाही गोळी लागली. गोळी लागलेल्या चारही जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये हा गोळीबार झाला आहे.. रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पालघर जिल्ह्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्यादरम्यान ही घटना घडली असून सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही.


Spread the love

Related posts

४ मासांत मुंबईत सर्वाधिक म्हणजे ३२५ बलात्कारांच्या घटनांची नोंद!

news

कणकवली हळवल फाटा येथे दगडफेक करत मारहाण…! पोलीसांना देखील मारण्याचा धमकी.

news

राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे १९ खलिस्तानी दहशतवाद्यांची नवी यादी जाहीर

news

Leave a Comment