क्राईम

राजकुमार सिंह यांच्या इंफाळ येथील घरावर काल रात्री अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला!

Spread the love

१६ जून वार्ता: मैतेई आणि कुकी समुदायात गेल्या दोन महिन्यापासून तणाव सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मणिपूरला आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील हिंसेचा आढावा घेतला होता. अधिकारी आणि काही प्रतिष्ठीत लोकांशी त्यांनी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात हिंसा भडकल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राज्यातील हिंसाचार पाहता स्थानिक आमदारांनी आपल्या घराबाहेर एक बॉक्स ठेवला आहे. लुटमार करून आणलेली आणि हिसकावून आणलेली हत्यारे या बॉक्समध्ये टाका, असं या बॉक्सवर लिहिण्यात आलं आहे. नागरिकांनी हिंसा करू नये म्हणून आमदारांनी ही शक्कल लढवली आहे. केंद्रीय मंत्री राजकुमार सिंह यांच्या इंफाळ येथील घरावर काल रात्री अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. पेट्रोल बॉम्ब फेकताच आगीने पेट घेतला आणि घरभर आग पसरली. घराला आग लागताच घरातील लोक तात्काळ बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. आंदोलकांनी थेट मंत्र्यांच्याच घराला लक्ष्य केल्याने राज्यातील जनतेत प्रचंड असंतोष असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मंत्री राजकुमार सिंह हे केरळ दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या हल्ल्यातून ते बचावले आहेत.


Spread the love

Related posts

दोन दिवसांपूर्वी मृत झालेल्या प्रसाद लोक यांच्या पत्नीने केली आत्महत्या.

news

चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही! एन्.सी.सी. ठाणे प्रकरण.

news

जानेवारी ते मार्च या काळात मुंबईमधून ३८३ मुली बेपत्ता!

news

Leave a Comment