स्टोरी

पुरुषांच्या तुलनेत काही महिलांचे सेक्स पाटर्नस जास्त! नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार मिळाली माहिती…..

Spread the love

२८ जुलै वार्ता: नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे मधून देशातील विविध राज्यात राहणाऱ्या व्यक्तींच्या सेक्स पार्टनरविषयी माहिती मिळाली आहे. यामधून समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पुरुषांच्या तुलनेत काही महिलांचे सेक्स पाटर्नस जास्त होते. याचाच अर्थ महिलांनी एकापेक्षा अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे हा भारतातील ११ राज्यांमध्ये करण्यात आला. ज्यामध्ये सुमारे १.१ लाख महिला आणि १ लाख पुरुषांनी सहभाह नोंदवला होता. या सर्वेक्षणात असं समोर आलंय की, ४ टक्के पुरुषांनी अशा महिलांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत ज्यांच्यासोबत ते राहत नव्हते. इतकंच नव्हे तर या महिलांना ते ओळखतही नव्हते.

याशिवाय महिलांची या बाबतीत संख्या पुरुषांपेक्षा कमी आहे. महिलांच्या बाबतीत ही संख्या पाहिली तर ती ०.५ टक्के होती. मात्र राजस्थानचं चित्र पाहिलं तर ते फारच वेगळं दिसून आलं. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार महिलांचे सेक्स पार्टनर पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं. ज्या राज्यांमधून ही आकडेवारी समोर आली आहे त्यात हरियाणा, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, आसाम, लडाख, तामिळनाडू, लक्षद्वीप, पुद्दुचेरी आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश होता. या राज्यांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर असल्याचं समोर आलं.


Spread the love

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही छत्रपती शिवरायांच्या प्राचीन मंदिराला निधी न देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा.

news

यापुढील जागर यात्रा शांततेत नसणार ! – अमित ठाकरे

news

मसुरे देऊळवाडा शाळेत “ओळख रानभाज्यांची” उपक्रम संपन्न.

news

Leave a Comment