स्टोरी

कल्याण पूर्व भाजपा मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांचा वाढदिवस विविध समाजउपयोगी उपक्रमाने उत्साहात साजरा!

Spread the love

सिध्दार्थ नगरात जेष्ठ नागरीक कट्टा आणि वाचनालयाचे अनौपचारीक लोकार्पण….

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष आणि परिवहन समिती सदस्य संजय बाबुराव मोरे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी विविध समाजउपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमलंग रोड जवळील गांवदेवी रोडवर असलेल्या संजय मोरे संचालित ‘स्वराज ‘ या सेवा भावी संस्थेच्या कार्यालय प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत इयत्ता १० वी तसेच १२ वी मध्ये विशेष गुण संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र तसेच भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला. तसेच काही दिव्यांग व्यक्तींचे जिवन सुकस व्हावे म्हणून त्यांच्या आवश्यकते नुसार त्यांना साधन सामुग्री देण्यात आली. एका गतीमंत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जिवनावश्यक वस्तू देण्यात आल्या तर जेष्ठ नागरीकांचा समयोचित सत्कार करण्यात आला .सिद्धार्थ नगर येथील साई बाबांच्या मंदीराचे बाजुला संजय मोरे यांनी स्वखर्चातून निर्माण केलेल्या परंतु अद्यापही निर्माणाधीन असलेल्या भव्य जेष्ठ नागरीक कट्टा तसेच वाचनालयाचे अनौपचारीक लोकार्पण आमदार श्री गणपत गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. या समयी संजय मोरे यांच्या कार्याचे कौतुक करतांना आमदार गणपत गायकवाड म्हणाले की, माझ्या पेक्षा जेष्ठ नागरीकांसाठी संजय मोरे हे करीत असलेले काम जास्त आणि मोठ्या प्रमाणात आहे, जेष्ठांचे आशिर्वाद प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी उर्जा देणारे असतात म्हणूनच संजय मोरे यांची सर्व क्षेत्रात उल्लेखनिय प्रगती होत आहे, चार वर्षानंतर मलाही जेष्ठ नागरीकांच्या जोडीला जावे लागेल असेही ते मिश्कीलपणे म्हणाले.

यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य दत्ता गायकवाड, माजी परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के आदी मान्यवर तसेच जेष्ठ नागरीक उपस्थित होते. स्वराज संस्थेच्या प्रांगणात सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रमात गौरी विनायक बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सचे संचालक संजयशेठ गायकवाड, अॅड विकी महाले, तसेच के. एल वासनकर, देवचंद अंबादे, संदिप तांबे, नरेंद्र सुर्यवंशी आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून संजय मोरे यांना शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

गुळदुवे ग्रामस्थांनी राबवली नदीपात्र साफसफाई मोहिम.

news

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या आरंभ प्रदर्शनाचे २५ रोजी कणकवलीत उद्घघाटन!

news

सावंतवाडी नगरपरीषदेचे पाणीपट्टीचे वार्षिक महसूल दीड कोटी रुपये!

news

Leave a Comment