शिक्षण

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबरोबरच गणवेश देणार! शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे

Spread the love

सिंधुदुर्गनगरी: दि.१४ (जि.मा.का):- शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ शाळा सुरु होत असून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरु होत आहे. विद्यार्थ्यांसाठी शासनाने ५७ हजार ४६८ पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील २५ हजार २७० विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ७५ लाख ८१ हजार इतका निधी दिला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी दिली.

शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४दिनांक १५ जून २०२३ पासून सुरु होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा दिनांक १५ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकती सर्व पूर्व तयारी करण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, समग्र शिक्षाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची दि. १३ जून रोजी आढावा सभा घेवून शाळांच्या पूर्वतयारीचा आढावा घेवून सखोल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. निकषानुसार पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना एकुण ५७ हजार ४६८ पाठयपुस्तके प्राप्त झाली असून ती शाळास्तरापर्यंत पोहोच करण्यात आलेली आहेत. तालुकानिहाय पाठ्यपुस्तके पुढीलप्रमाणे- तालुकानिहाय वितरीत करण्यात आलेली मोफत पाठ्यपुस्तके तालुका देवगड पाठ्यपुस्तके संख्या – ८ हजार ४६०, दोडामार्ग -२ हजार ७३९, कणकवली- ९ हजार ४१४, कुडाळ- ११ हजार ९७२, मालवण- ६ हजार २५६, सावंतवाडी- १० हजार ४२२, वैभववाडी- ३ हजार १३४ व वेंगुर्ला- ५ हजार ७१ असे एकूण ५७ हजार ४६८ पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव शाळा शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. दाखल होणान्या मुलांचे स्वागत उत्साहपूर्व व आनंददायी वातावरणात होणार आहे. शाळा प्रवेशोत्सवाबरोबरच शाळापूर्व तयारी पहिले पाऊल मेळावा क्र. २ चे आयोजन सुध्दा करण्यात आलेले आहे. तसेच शाळांशाळांमध्ये प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरणासाठी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना एक गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यावर्षीसुध्दा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बळीराजासाठी एक दिवस, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा, बाल कला क्रीडा महोत्सव. इसरो शैक्षणिक सहल इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हयामध्ये १२८ शाळा शून्य शिक्षकी झाल्या असल्यातरी उपलब्ध शिक्षकांमधून या सर्व शाळांवर शैक्षणिक कामकाजासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिक्षकाविना कोणतीही शाळा बंद राहणार नाही. याचीही दक्षता घेण्यात आलेली आहे. तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेशीत करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

कणकवली तालुक्यातील शिक्षकांचा शिक्षक समितीतून प्राथमिक शिक्षक भारतीत जाहीर प्रवेश.

news

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती!

news

जि. प. बिळवस देऊळवाडा, बिळवस नंबर १ शाळेचा शेतकरी राजासाठी एक आदर्शवत उपक्रम “बांधावरची शाळा”

news

Leave a Comment