स्टोरी

फसवणूक टाळण्यासाठी नोटीस, आदेशाची पडताळणी करा! राज्यकर उपायुक्त संजय मोटकर

Spread the love

सिंधुदुर्गनगरी: वस्तू व सेवा कर कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या नावे जर कोणत्याही प्रकारची नोटीस तसेच आदेशाची प्रत प्राप्त झाल्यास सदर नोटीस अथवा आदेश यांची ऑनलाईन तसेच संबंधित कार्यालयात संपर्क करून प्रथम पडताळणी करून घ्यावी. त्यानंतरच आपले म्हणणे कार्यालयास योग्य मार्गाने सादर करावे, जेणेकरून आपली होणारी फसवणूक टाळता येऊ शकते, असे आवाहन वस्तू व सेवा कर कार्यालय ओरोस, सिंधुदुर्ग चे राज्यकर उपायुक्त संजय मोटकर यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यापा-यास अज्ञात इसमामार्फत मिळालेल्या GST बनावट आदेश प्रकरणाच्या अनुषंगाने हे आवाहन करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिर संपन्न!

news

रोटरी क्लब मुंबई – माहीम’ मार्फत वडाचापाट हायस्कुलला प्रिंटर प्रदान 

news

मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे १९ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम!

news

Leave a Comment