शिक्षण

खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कळसुलकर हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

Spread the love

 

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक गुणवंत राज्यात आव्वल आहे.मात्र या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा १०० हून अधिक शाळा हे शून्य शिक्षकी शाळा आहेत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला. ते कळसुलकर हायस्कूलमध्ये आज वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

 


यावेळी खासदार राऊत पुढे बोलताना म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक विश्वात राज्यात आघाडीवर आहे त्याचे श्रेय शिक्षक व शैक्षणिक संस्थांना देणे आवश्यक आहे.यामध्ये राजकारणाचे कोणतेही श्रेय नाय. मातृभाषेतून आपण शिक्षण घेतले पाहिजे त्यातून दर्जेदार नागरिक घडत असतो.आज मातृभाषेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला बॅरिस्टर नाथपई मधु दंडवते यासारखे अनेक विचारवंत भेटले त्यांनी जिल्ह्याचे नाव देशभर चमकवले असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.

यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत, जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, बाळा गावडे,शब्बीर मणियार, माजी जिल्हा परिषद मायकल डिसोजा, अपर्णा कोठावळे, सागर नानोसकर, जावदे शाहा समीरा खलीप आदी उपस्थित होते

 


Spread the love

Related posts

शिरशिंगे गावाचा कौतुकास्पद उपक्रम.

news

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल घोषित!ठाणे येथील कश्मिरा संखे देशात २५ वी, तर राज्यातील १५ जणांचा श्रेणीत समावेश!

news

मसुरे केंद्र शाळेमधील शिक्षक प्रश्नासंदर्भात योग्य ते सहकार्य करण्याचे शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांचे आश्वासन.

news

Leave a Comment