क्राईम

कणकवली जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड! १२ जण पोलिसांच्या ताब्यात.

Spread the love

२६ मे वार्ता: कणकवली येथील नागवे रोडवर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी आज पहाटे सुमारे ३ वाजता धाड टाकली आहे. यावेळी १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व झुगार खेळणारे कणकवली, मालवण, सावंतवाडी आणि कुडाळ येथील रहिवाशी आहेत. पहाटे अंधारात अचानक धाड पडल्याने अंधाराचा फायदा घेत काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.

या दरम्यान पोलिसांनी जयवंत आत्माराम बाईत ( वय ४९ वर्षे, रा. कणकवली तेलीआळी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग), सिध्देश भास्कर ठाकुर, (वय ३९ वर्षे, रा. कलमठ लांजेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग), संतोष बाळकृष्ण कुडतरकर( वय ५० वर्षे, रा. माणगाव बाजारपेठ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), विशाल वासुदेव सावंत (वय ४५ वर्षे, रा. सावंतवाडी वैश्यवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), केतन रावजी ढोलम ( वय ३५ वर्षे, रा. कोळ आडारीवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, मुळ रा. मुंबई), महेश गंगाधर जोगी (वय ३२ वर्षे, रा. मालवण बाजारपेठ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), कुलराज भगवान बांदेकर (वय २२ वर्षे, रा. मालवण जोशीवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), शुभम कृष्णकांत मिठबावकर, (वय २२ वर्षे, रा. मालवण हडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), रोहन जितेंद्र वाळके (वय २९ वर्षे, रा. मालवण देऊळवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), हेमराज प्रकाश सावजी (वय ३० वर्षे, रा. वायरी भुतनाथ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), विनायक शिर्के (कलमठ कणकवली), सहील आचरेकर यांना ताब्यात घेतले आहे. तसेच यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.


Spread the love

Related posts

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

news

म्हसळयात ५ दुचाकी आणि १ कार पार्कीग मध्ये जाळण्याचा प्रकार आज्ञात इसमावर गुन्हा नोंद….

news

मुंबई येथे मुसलमानाकडून फसवल्याविषयी हिंदु युवतीची तक्रार! विवाह करण्यास मात्र नकार!

news

Leave a Comment