क्राईम

‘तरुणीला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत असलेल्या मोहम्मद फैजान खान गुन्हा दाखल…..

Spread the love

२२ मे वार्ता: मध्य प्रदेशातील इंदूरमधील एक तरूणी दोन दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडसोबत ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. चित्रपट पाहिल्यानंतर तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्यात वाद झाला. त्यानंतर या तरुणीने थेट बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला. इंदूरमधील हारून कॉलनीत राहणाऱ्या मोहम्मद फैजान खान या तरुणाविरुद्ध तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार, मोहम्मद याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीची चार वर्षांपूर्वी मोहम्मद फैजान खान याच्याशी कोचिंग क्लासमध्ये ओळख झाली होती. दोघांची घट्ट मैत्री झाली. याचे रुपांतर प्रेमात झाले. काही कालावधीनंतर फैजानने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फैजान हा या तरुणीला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होता. त्यासाठी त्याने अनेकवेळा तरुणीला मारहाणही केली, अशी तक्रार या तरुणीने दिली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून इंदूरच्या खजराना पोलिस ठाण्यात पोलिसांनी फैजान नावाच्या व्यक्तीविरुद्ध लव्ह जिहादचा गुन्हा दाखल केला आहे. फैजानने आपले खरे नाव लपवून तिच्याशी मैत्री केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फैजानला अटक केली.


Spread the love

Related posts

news

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली माने यांच्यावर गुन्हा दाखल?

news

भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न ! आरोपीला पोलिसांनी केली अटक….

news

Leave a Comment