स्टोरी

मसुरे भरतेश्वर मंदिर येथे ३० मार्च रोजी रामनवमी उत्सव…

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती राजा श्री देव जैन भरतेश्वर मंदिर देऊळवाडा येथे गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी रामनवमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. सकाळी ९:३० वाजाता पुराण वाचान, १० वाजता कीर्तन, १२ वाजता श्री प्रभूराम जन्मोत्सव, १२:४५ वाजता महाआरती, १:१० शाही श्रींचा पालखी सोहळा, १:३० वाजता महाप्रसाद, शुक्रवार दिनांक ३१ मार्च रोजी लळीत कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९:३० वाजता पुराण वाचन, १० वाजता शाही पालखी सोहळा तदनंतर १०:२० वाजता शक्तीपीठ श्री माऊली मंदिर येथे श्रींच्या शाही पालखीचे प्रस्थान व माऊली मंदिर येथे शिव शक्ती भेट , १०: ४५ वाजता कीर्तन, ११ : २५ वाजता माऊली मंदिर येथून श्रींच्या शाही पालखीचे भरतेश्र्वर मंदिरकडे प्रस्थान, १२ वाजता दशावतार नाटक . असा सोहळा संपन्न होणार असून या या सोहळ्यात सर्व भाविकांनी उपस्थीत राहून श्रींचे शुभाशीर्वाद घ्यावेत. असे आवाहन श्री देव जैन भरतेश्वर मंदिर ट्रस्ट व सर्व मानकरी गाव रहाटी कसबा मसुरे यांनी केले आहे…


Spread the love

Related posts

देवसू गावचे सुपुत्र सत्यजित सावंत यांचा सन्मान…! उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल कोल्हापूर वनखात्याच्यावतीने गौरव.

news

भारताच्या इस्लामीकरणासाठीच लव्ह जिहादचे षड्यंत्र ! आमदार नीतेश राणे, भाजप

news

श्री देव बांदेकार ग्रामविकास मंडळ वेर्ले तर्फे किक बाॅक्सिग खेळाडू कु. श्रीकृष्ण लिंगवत याचा गौरव…!

news

Leave a Comment