स्टोरी

एक घास प्रेमाचा, दिवाळी पर्वाचा..! वेळकर फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम दिशादर्शक

Spread the love

जव्हार (दीपक पटेकर): प्रतीवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वेळकर फाऊंडेशनचा एक घास प्रेमाचा, दिवाळी पर्वाचा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या वर्षी महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे या उपक्रमात वेळकर फाऊंडेशन कडून फराळ वाटप न करता गृहोपयोगी धान्यांचे वाटप करून समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला. या उपक्रमासाठी यावर्षी जव्हार तालुक्यातील खैरमाळ या अतिदुर्गम पाड्याची निवड करण्यात आली होती. २०२२ ला या गावात पहिल्यांदा महावितरणची विज आली होती. रस्ताही नसलेल्या या पाड्यात पहिल्यांदाच कोणती गाडी गेली असेल तर ती वेळकर फाउंडेशनची. गाडी पाड्या पर्यंत पोहोचावी यासाठी ग्रामस्थांनीच श्रमदानाने पायवाटेची साफसफाई करुन, माती टाकून रस्ता बनवला. वेळकर फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे कच्चा का होईना पण मातीचा रस्ता तयार झाला होता. वेळकर फाउंडेशन कडून या समाजबांधवांना दिवाळी साजरी करण्यासाठी तांदूळ, तुरडाळ, मुगडाळ, साखर, तेल, गव्हाचे पिठ, कडधान्य, मिठ, शेवया, मसाले, साबण, मिठाई अशाप्रकारे प्रत्येक कुटुंबाला १४ किलोचे धान्य वाटप करण्यात आले.

त्याचसोबत महिलांना नविन साड्या, ड्रेस मटेरिअल, लहान मुलांसाठी चॉकलेट व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना सुद्धा या आनंदात सामील करुन घेण्यात आले. समाजबांधवांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आम्हाला खरी दिवाळी भेट देऊन गेला. भविष्यात या पाड्यासोबत जोडलेले राहून अजूनही विकासकामे करुन तेथील ग्रामस्थांसाठी तेथेच रोजगार निर्मिती करण्याचा वेळकर फाऊंडेशनचा मानस असल्याचे सांगून. अनेकांनी आर्थिक मदतीच्या रुपात दाखवलेल्या प्रेमामुळेच हा कार्यक्रम पुर्ण होऊ शकला असे सांगून वेळकर फाउंडेशन सोबत जोडले गेलेल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


Spread the love

Related posts

मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथील अतिथी अधिव्याख्यात्यांना पुन्हा सेवेमध्ये सामावून घ्या – आमदार वैभव नाईक

news

कृषी मित्र शेतकरी गटाची विषमुक्त शेतीकडे वाटचाल!

प्रसाद परब

सत्यमेव जयते फार्मर कप मध्ये सहभागी होण्याची संधी.!

news

Leave a Comment