स्टोरी

कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडणार.

Spread the love

नाशिक वार्ताहर, दि.३१: २०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडत आहे. सकाळी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त येथे पूजा केल्यानंतर त्या परत नाशिकमधील पोलिस अकादमीत विश्रांती करणार असून, संध्याकाळी त्या गोदाआरतीला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यावर राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, जयकुमार रावल, डॉ. अशोक उईके, राधाकृष्ण विखे पाटील, गुलाबराव पाटील, आकाश फुंडकर, नीतेश राणे आदी मंत्री सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार शुक्रवारी रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याचा तसेच ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सुरक्षा, वाहतूक, निवास, स्वागत व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणांची माहिती घेण्यात आली.


Spread the love

Related posts

नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य महोत्सवात मालवणी कवी प्रा. डॉ. नामदेव गवळी निमंत्रित..!

news

सावंतवाडी संस्थानची प्रसिद्ध माठयाची जत्रा गुरुवारी ७ डिसेंबर रोजी होणार….!

news

सावंतवाडीत ७ जानेवारीला छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ व्याख्यान व्याख्याते शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे. 

news

Leave a Comment