स्टोरी

महात्मा फुले एम.एस.डब्ल्यू. व मा. झ. मो. तु. बी.एस.डब्ल्यू. महाविद्यालय, तळोदा येथील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत घवघवीत यश!

Spread the love

नवी मुंबई: मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तसेच नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन २०२६’ अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत महात्मा फुले एम.एस.डब्ल्यू. व मा. झ. मो. तु. बी.एस.डब्ल्यू. महाविद्यालय, तळोदा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले आहे.या स्पर्धेत महाविद्यालयातील कु. प्रियंका कोकणी हिने द्वितीय क्रमांक, कु. अक्षता बारी हिने तृतीय क्रमांक, तर कु. सचिन गावित व कु. मनीषा रायसिंग यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या तसेच तळोदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष श्री. भरतभाई माळी, उपाध्यक्ष श्री. रोहित माळी, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व व्यवस्थापन समितीचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. निलेश गायकवाड, सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.तसेच, विद्यार्थ्यांनी भविष्यातही शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व साहित्यिक परंपरेला नवी झळाळी प्राप्त झाली आहे.


Spread the love

Related posts

मळगाव बाजारपेठ ते रेशन दुकान कडून नेमळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न!

news

सावंतवाडी पाणीपुरवठा विभाग: लाखो रुपयांचा खर्च तरीही शहरवासीय तहानलेलेच; प्रशासनाचा अनागोंदी कारभार अन् अनिमियातेचा संशय

newss

ठाणे उत्पादन शुल्क विभागातील तक्रारींवर चौकशी सुरू.!

newss

Leave a Comment