स्टोरी

ओरस येथे ‘पोलीस हुतात्मा दिन’ साजरा.

Spread the love

ओरस: दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी देशव्यापी ‘पोलीस स्मृती दिन’ (पोलीस हुतात्मा दिन) साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातहि २१ ऑक्टोबर २०२६ रोजी ओरोस येथील जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर पोलीस शहीद स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर पोलीस शहीद स्मृतिदिनानिमित्त शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या संचलनासह बंदुकीच्या फैरी झाडून वीर जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग्स येथे चिनी सैनिकांशी लढताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) १० जवान शहीद झाले होते। त्यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात आणि सर्व राज्यांच्या पोलीस दलात हा दिवस ‘पोलीस हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जात.


Spread the love

Related posts

प्रत्येक कलाकाराने सभासद होऊन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा…! संतोष कानडे 

news

कलंबिस्त येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दशावतार नाट्य महोत्सवाचे उद्घाटन…..

news

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या गहाळ अलंकारांविषयी चौकशी व्‍हावी!

news

Leave a Comment