स्टोरी

माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट वाचक स्पर्धा ; वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

सावंतवाडी(माजगाव): माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय मंडळ, माजगाव तर्फे उत्कृष्ट वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.मराठी भाषेचा गौरव करणे या हेतूने वाचन प्रेरणा दिनानिमित्त उत्कृष्ट वाचक पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालयाचे वाचक व माजगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री आर के सावंत सर होते तर दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून श्री नितीन सोनाळकर सर होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा श्रीमती मीरा कासार यांनी केले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपती, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहण्यात आली. ग्रंथालयाचे समिती सदस्य व माजी उपसरपंच माननीय संजय विठ्ठल कानसे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले.याप्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत मुकुंद सावंत गुरुजी, समिती सदस्या सौ शितल सावंत यांच्यासहित ग्रंथालय समितीचे सदस्य, तसेच ग्रंथालयाचे मान्यवर वाचक, गुरुजन वर्ग, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

उत्कृष्ट वाचक पुरस्कार विजेते –ग्रंथालयातर्फे वाचन संस्कृतीसाठी उत्तम योगदान देणाऱ्या वाचकांना उत्कृष्ट वाचक म्हणून पुरस्कार देऊन व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट वाचक म्हणून – भरत कृष्णा सावंत भोसले, सौ सुप्रिया उदय सुतार, सौ रूपाली अजित तारी यांना गौरविण्यात आले.*उत्कृष्ट बालवाचक म्हणून कु गार्गी निलेश माजगावकर, कुमार दक्ष सुभाष सावंत यांना गौरविण्यात आले.या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले.त्यानंतर माजगाव येथील जिल्हा परिषद शाळा नंबर क्रमांक एक चे मुख्याध्यापक माननीय श्री बांदेकर सर, सौ प्रिया सुतार, श्री भरत सावंत भोसले यांनी स्वर्गीय डॉ. ए. पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा संपूर्ण आढावा घेऊन आदरांजली वाहिली. शालेय विद्यार्थ्यांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या काही निवडक पुस्तकातील उताऱ्याचे वाचन करून त्यांना आदरांजली वाहिली.ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत मुकुंद सावंत गुरुजी तसेच सदस्या शितल सावंत मॅडम यांचीही भाषणे झाली.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ शितल सावंत मॅडम यांनी केले. अशा प्रकारे वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम या संस्थेतर्फे मोठ्या उत्साहात पार पडला.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल सौ मधु कुंभार, लिपिका सौ रोशनी निबरे तसेच सेविका माया साळगावकर यांनी अथक परिश्रम घेतले


Spread the love

Related posts

राजा शिवाजी विद्यालय हे विलवडे पंचक्रोशीचे वैभव आहे…! शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

news

मुसलमानांना नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा! आमदार नितेश राणे यांचे आवाहन

news

दोडामार्ग ते मुंबई “शिवशौर्य यात्रेचे” आयोजन….

news

Leave a Comment