स्टोरी

बिलेवाडीत श्रमदानातून बंधारा साकार! शिवसेना तालुका प्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम पाणी अडवा, पाणी जिरवा.

Spread the love

सावंतवाडी: बिलेवाडी ग्रामस्थांचा जलसंधारणासाठी पुढाकारइन्सुली, बिलेवाडी :सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे महत्त्व ओळखून पावसाचे पाणी अडवणे आणि जमिनीत जिरवणे ही काळाची गरज बनली आहे. याच विचारातून शिवसेना तालुका प्रमुख श्री. नारायण ऊर्फ बबन राणे यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी तालुक्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेचा एक भाग म्हणून इन्सुली येथील बिलेवाडी परिसरात बंधारा बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. बबन राणे यांनी बिलेवाडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बापू कोठावळे यांच्याकडे बिलेवाडीतही अशाच प्रकारे बंधारा बांधण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत बापू कोठावळे यांनी तातडीने होकार दिला. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा इन्सुली नंबर ७, बिलेवाडी येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि बिलेवाडी ग्रामस्थ यांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा उभारला.श्री. नारायण ऊर्फ बबन राणे यांच्या उपस्थितीत साकारलेल्या या बंधाऱ्यामुळे लोकसहभागातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

गावाच्या पाणीप्रश्नाचा विचार करून ग्रामस्थांनी एकत्र येत केलेले श्रमदान हे सामाजिक एकजुटीचे आणि गावाच्या विकासासाठी असलेल्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले आहे.पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून मानवी जीवनाचा आधार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, पावसाचे पाणी अडवणे आणि ते जमिनीत जिरवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यास मदत होते. गावोगावी अशाच प्रकारचे उपक्रम राबविले गेल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निश्चितच हातभार लागू शकतो.या उपक्रमावेळी जिल्हा परिषद शाळा इन्सुली नंबर ७ चे मुख्याध्यापक श्री. दिलीप चव्हाण सर, सहशिक्षक श्री. महेश सावंत सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बापू कोठावळे, गोपाळ कोठावळे, रवींद्र कोठावळे, जयराम ठाकूर, सचिन कोठावळे, आप्पा सावंत, सुशांत सावंत, बुधाजी कोठावळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गजेंद्र कोठावळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येऊन गावाच्या हितासाठी केलेले हे कार्य समाजापुढे एक सकारात्मक आदर्श ठेवणारे आहे.


Spread the love

Related posts

लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड परिमल नाईक यांचा सत्कार !

news

मंगल कामत यांची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या व तक्रारींचे निवारण सदस्य पदी निवड.

news

राणे साहेबांच्या विचारातून जिल्हा बँकेचा पारदर्शक कारभार…! माजी खासदार डॉ निलेश राणे

news

Leave a Comment