सावंतवाडी प्रतिनिधी: आजच्या पिढीने आधुनिक होणं गरजेचं आहे परंतु, आधुनिकतेची कास आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी प्रशस्त केलेल्या सिध्द साधना मार्गाशी जोडुन आपलं जीवन साधनेच्या बळावर सुखी आणि समृद्ध केलं पाहिजे. असं मत तपस्वी परम पूज्य भैय्याजी यांनी मासिक शिवा ज्ञान पत्रिकेच्या प्रकाशन सोहळ्यात आशिर्वचन देताना व्यक्त केले.चक्र ध्यान साधना आणि मंत्र उर्जा उपचार पद्धती संदर्भात गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असलेल्या गोव्यातील शिवा सायन्स मेडिटेशन आश्रमात डॉ नम्रता रेडकर निर्मीत मासिक शिवा ज्ञान चे प्रकाशन परम पूज्य भैय्याजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दै तरुण भारत चे संपादक सागर जावडेकर, दै नवहिंद टाइम्स चे संपादक विजय डिसुजा, गोव्यातील पहिली राष्ट्रीय उपग्रह हिंदी वृत्त वाहिनी राष्ट्र टी व्ही चे संपादक संदीप केरकर, दुरदर्शन चे जेष्ठ वार्ताहर अभय जोशी, धामसेच्या पंच ज्योती गावकर, दशरथ गावकर यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवा ज्ञान मासिकाच्या संपादिका डॉ नम्रता रेडकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. तदनंतर मासिक शिवा ज्ञान मासिकाचे प्रकाशन पार पडले. प्रास्ताविक पर मनोगतात डॉ नम्रता रेडकर यांनी शिवा ज्ञान पत्रिकेच्या निर्मीतीचा हेतू स्पष्ट करत शिव शिवाच्या प्राकृतिक विज्ञानाच्या अस्विकृतीमुळे मानवी जीवनात होत असलेल्या दुर्दशेवर प्रकाश झोत टाकला. आज सर्वत्र वाढत्या आजारांचे, विस्कळीत कुटुंब व्यवस्थेचे आणि एकुणच सामाजिक अशांततेचे मुळ कारण व्यक्तिचे स्वतः चे कर्म,वास्तु,पितृ, आदी दोषांमध्ये दडलेले असुन बदलत्या जीवनशैलीमुळे त्यात अधिकच भर पडत असुन मानवी जीवन सुखकर करण्यासाठी सर्व जाती धर्म आणि पंथातील प्रत्येकाने सिध्द साधना मार्गा स्विकारुन आपलं आणि इतरांच आयुष्य स्व साधना बळावर आनंदी आणि यशस्वी कराव यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीला चक्र ध्यान साधना पद्धती बद्दल माहिती देण्यासाठी आपण मासिक शिवा ज्ञान चा शुभारंभ करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.प्रमुख पाहुण्यांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यात मासिक शिवा ज्ञान ला शुभेच्छा देताना संपादक सागर जावडेकर यांनी आश्रमात आल्यानंतर आपल्याला अस्वस्थ शारिरीक अस्वस्थतेत काही चमत्कारिक प्रभाव दिसून आल्याचे सांगत प्राचीन ऋषीमुनींनी तपश्र्चर्या करून सिध्द मंत्र उर्जा विज्ञानाची मानवाला दिलेली अमूल्य ठेव सर्वांनी जतन करून तीचा स्विकार करून तीच्या प्रसार प्रचाराचे दैवी कर्तव्य पार पडले पाहिजे असे मत व्यक्त केले. राष्ट्र टी व्ही चे संपादक संदीप केरकर यांनी आश्रमात सुरू असलेल्या चक्र ध्यान साधना आणि मंत्र उर्जा उपचार पद्धती संदर्भात ते मागील पंधरा वर्षांपासून परिचीत असल्याचे सांगत आज देश विदेशातील साधक गोव्यात ध्यान साधनेसाठी येत असल्याचे पाहून मनस्वी आनंद होत असल्याचे आणि आगामी काळात राष्ट्र टी व्ही च्या माध्यमातून या दैवी कार्याला व्यापक प्रसिद्धी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी गोव्यासह देशातील विविध राज्यांतून आलेल्या साधकांसह ऑनलाईन पद्धतीने विदेशातील साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधक रवी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन माजी प्राचार्य सुभाष बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रमातील सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
