नागपूर (म. ला. देसाई): महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मीती मंडळ यांची सभा नागपूर येथे अध्यक्ष माननीय श्री रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव डॉक्टर शामकांत देवरे व इतर सदस्य व कर्मचारी यांच्या उपस्थित दिनांक 9/10/2026 रोजी हॉटेल नॉर्थ व्हू नागपूर येथे सपन्न झाली. प्रथम साहित्यिक व थोरदिवंगत व्यक्ती विजया मेहता, कुमार सप्तर्शी, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, तिजनबाई पंड .वानी, द. मा. धामणस्कर, प्रा. यास्मीन शेख, अभिनेते नाना पाटेकर यांना इतर दिवंगत झालेल्या व्यक्तीना सभागृहात श्रद्यांजली अर्पण करण्यात आली. . महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष र निर्मीती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रविंद्र शोभणे यांनी सर्वांचे स्वागत केले . महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाची वाई येथे 24 जून 2026 रोजी झालेल्या सभेच्या बैठकितील इतिवृत्त ला मंजुरी देण्यात आली ‘ त्याचप्रमाणे मराठी विश्वकोश आवृत्ती दोन ची कामे कोणत्या प्रगतीपथावर आहे यांची सभागृहात माहिती देण्यात आली तसेच कुमार विश्वखंड भाग दोन ते बाराच्या कामाच्या नियोजनाची माहिती देण्यात आली कुमार विश्वखंड 2 ते 12 एकाच वेळी प्रकाशित करीत असल्यामुळे त्यांचं काम प्रगतीपथावर आहे बाल विश्वकोष खंडाचे नियोजन सांगण्यात आले आणि त्या संदर्भात कामाची माहिती देण्यात आली. ऑलम्पिक कोष नियोजन आणि समन्वयक म्हणून नेमण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

तसेच अभिजीत भाषा मराठी सप्ताह, वाचन प्रेरणा , मराठी भाषा पंधरवडा व मराठी भाषा गौरवदिन याविषयीच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन मंडळातील सर्व सदस्यांना अवगत करण्यात आले आणि घेतलेल्या कार्यक्रमाचे नियोजन सांगण्यात आले सिंधुदुर्गमध्ये 15 ऑक्टोबरला डॉक्टर ए .पी .जे .अब्दुल कलाम यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाचन प्रेरणा दिन, नेमळे पंचक्रोशी हायस्कूल नेमळे येथे घेण्याचे ठरले . दर्जेदार कार्यक्रम होण्यासाठी सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात सहज सक्रिय सहभाग घेण्याची विनंती अध्यक्षांनी केली. विस्तारित ज्ञान मंडळ शासन निर्णय व विश्वकोश नोंद लेखन याबाबत मंडळ ना कामाबाबतची माहिती अवगत करण्यात आली . सर्व सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला व जास्तीत जास्त नोंदी दर्जेदार कसे होतील या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य नमिता किर, डॉ. विश्वास पाटील, अशोक राणे, श्रीकांत बोजेवार, डॉ मिलींद वाटवे ,महेश केळूसकर, सुरेश कदम सिंधुदुर्ग जिल्ह्यातून डॉक्टर शरयू आसोलकर, वृंदा कांबळी, वामन पंडित तसेच म.ल. देसाई व इतर सदस्य व श्रीललित कुडमथे, वर्षाराणी नाईक, सचिन भाडळकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. अभिजीत मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने देणे प्रतिभेचे मराठी कवितांच्या गीतापर्यंतचे लोभनीय प्रवास या कार्यक्रमाचे आयोजन संध्याकाळी साडेपाच वाजता साई सभागृह शंकरा नगर नागपूर येथे करण्यात आले यामध्ये गायिका हिंदी चित्रपट संगीत अभ्यासक विषय तज्ञ आणि लेखिका डॉक्टर मृदुला दाढे आणि सहकार्य निलेश निरगुडकर ,विशेष सहभाग विख्यात साहित्यिक माजी संमेलन अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे ,तसेच डॉक्टर श्यामकांत देवरे सचिव महाराष्ट्र मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांची उपस्थिती होती.
