शिक्षण

कळसुलकर हायस्कूल मध्ये अभिजात मराठी भाषा गौरव दिवस सप्ताह निमित्ताने श्री भरत गावडे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्श.

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर हायस्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशाले मध्ये आज रोजी अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताह निमित्ताने अभिजात मराठी भाषेतील अधिक संशोधन संवर्धन व जनजागृती व्हावी यासाठी प्रशालेमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अभ्यासक श्री भरत गावडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेच्या ज्येष्ठ मराठी शिक्षिका श्रीमती एम.एम.कदम यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून दिले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत व्ही.भुरे यांनी मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे श्री भरत गावडे यांचे पुष्पगुच्छ व प्रशालेची प्रतिमा देऊन स्वागत केले. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, मराठी विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.जी.एस.सावंत, श्रीम.एम.एम.कदम, प्रशालेचे वरिष्ठ लिपीक श्री मोहन पालेकर यांचे स्वागत करण्यात आले. प्रशालेच्या मराठी शिक्षिका श्रीमती एम.एम.कदम यांनी अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे प्रास्ताविक केले. तसेच मुख्याध्यापक श्री एस.व्ही.भुरे सर यांनी अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेचे महत्व विशद केले मराठी भाषा व अन्य भाषा यातील सहसंबंध स्पष्ट केले व उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांना भाषा गौरव दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तदनंतर मराठी भाषेचे थोर अभ्यासक श्री भरत गावडे सर यांनी प्रशालेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धनाच्या साठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. आपल्या व्याख्यानातून श्री भरत गावडे सर यांनी भाषेच्या संवर्धनासाठी प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, संतांचीअभंग, कथालेखन, कादंबरी, काव्य लेखन तसेच पत्रलेखन, वृत्तलेखन, मराठी वाचन पद्धती, वाचनाचे महत्त्व, मराठी भाषा लेखन पद्धती, विरामचिन्हे, व्याकरण संदर्भ तसेच मराठी भाषेतील कवी, लेखक यांच्या साहित्यांचा परिचय आदी आपल्या वक्तृत्वातून करून दिले. तसेच मराठी भाषेतील इतर बोलीभाषांचा परिचय ही सुरेखपणे करून दिला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रशालेतील मराठी भाषा समिती प्रमुख श्री पी.बी.बागुल यांनी मार्गदर्शक श्री भरत गावडे सर व उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे आभार मानले.


Spread the love

Related posts

राज्यातील अल्प पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी क्लस्टर (समूह) शाळेचा प्रयोग राबवला जाणार!

news

सावंतवाडी तालुक्यातील राणी पार्वती देवी हायस्कूल येथे विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न.

newss

कलंबिस्त इंग्लिश स्कूल मध्ये चावडी वाचन व गणन उपक्रम.

news

Leave a Comment