स्टोरी

कुमामे आणि डिकवल येथील BSNL टॉवर लवकरच होणार कार्यान्वित!​

Spread the love

मालवण प्रतिनिधी: गाव मौजे कुमामे आणि डिकवल येथे BSNL चे मोबाईल टॉवर बांधून पूर्ण झाले आहेत, मात्र ते अद्यापही सुरु न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच सुभाष लाड यांनी आज दुपारी BSNL कार्यालय सावंतवाडी येथे भेट देऊन कार्यालय प्रमुख श्री. सागर सर यांची भेट घेतली आणि टॉवर त्वरित सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.​या बैठकीत डिकवल येथील BSNL टॉवरच्या केबलचे प्रलंबित काम प्राधान्याने पूर्ण करण्यावर चर्चा झाली. त्यावर उत्तर देताना BSNL चे कार्यालय प्रमुख सागर सर यांनी, “डिकवल येथील टॉवरच्या केबलचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण केले जाईल आणि हा टॉवर एका महिन्याच्या आत पूर्ण क्षमतेने सुरू केला जाईल,” असे सकारात्मक अभिवचन माजी सरपंच सुभाष लाड यांना दिले.​तसेच कुमामे येथील टॉवरबाबतही आवश्यक त्या तांत्रिक बाबी लवकरात लवकर पूर्ण करून तोही सेवेत दाखल केला जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.​या दोन्ही गावांमध्ये टॉवर उभारून तयार असतानाही नेटवर्क मिळत नसल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. आता BSNL प्रशासनाने दिलेल्या या आश्वासनामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, येत्या महिन्यात या भागातील नेटवर्कचा प्रश्न कायमचा सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Related posts

भारताच्या सध्याच्या क्रिकेटपटूंना पैशांमुळे अहंकार झाला आहे! ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव….

news

सावंतवाडी भटवाडी मोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले! मोटर सायकल चालक बाल बाल बचावला.

news

“SIR” नावाचा नॅशनल गेम…! विद्यार्थी शिक्षकांना, शिक्षक पालकांना व पालक शोधत आहेत माय- बापांना?

प्रसाद परब

Leave a Comment