स्टोरी

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्या वतीने ‘कोमसाप गीत रचना’ स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी(दीपक पटेकर ): मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या (कोमसाप) वतीने संस्थेचे अधिकृत ‘कोमसाप गीत’ निश्चित करण्यासाठी एका विशेष गीत रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील नवोदित व ज्येष्ठ साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा आयोजित केली आहे. परिषदेच्या प्रत्येक अधिकृत कार्यक्रमाच्या प्रारंभी अभिमानाने आणि सामूहिक स्वरात गायले जाईल अशा गीताची निवड करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या गीताद्वारे कोमसापची ओळख, मराठी साहित्याचा गौरव आणि कोकणची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अधोरेखित केली जाणार आहे. गीत रचनेसाठी महत्त्वाच्या अटी व निकषात गीत एकूण १२ ओळींचे असावे. (प्रत्येक कडव्यात ३ ओळी याप्रमाणे एकूण ४ कडवी), रचनेत कोमसापची वाटचाल व ध्येय, मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव, कोकणची निसर्गसमृद्धी (समुद्र, डोंगर, माती), साहित्यिक परंपरा, ज्ञान-सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समावेश असावा. तसेच रचना प्रेरणादायी, भावपूर्ण, ओजस्वी आणि सहज समूहगायन करता येईल अशी असावी. शब्द साधे पण साहित्यिक दर्जाचे असावेत. ही स्पर्धा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. प्रथम शाखा स्तरावर, त्यानंतर जिल्हा स्तरावर तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल. अंतिम फेरीत कोकणातील साताही जिल्ह्यांमधून निवडलेल्या सर्वोत्तम रचनांमधून परीक्षक मंडळाद्वारे एका उत्कृष्ट गीताची अधिकृत ‘कोमसाप गीत’ म्हणून निवड केली जाईल. निवड झालेल्या विजेत्या गीतकाराचा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने विशेष सन्मान व गौरव करण्यात येणार आहे. ही स्पर्धा कोमसाप आजीव सदस्यांसाठी मर्यादित असल्याने सावंतवाडी तालुक्यातील कोमसापच्या सर्व आजीव सभासदांनी या अभिनव स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोमसापच्यावतीने शाखा अध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले आहे. स्पर्धेसाठीचे गीत या ९४२१२३७५६८ व्हाट्सअप नंबरवर दि. १२ सप्टेंबर पूर्वी पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ च्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन…!

news

श्रावण मासानिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात भागवत कथा सप्ताहाचे आयोजन – महेश इंगळे

news

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हरसिटी लवले पुणे येथे, ८ नोव्हेंबर ते १० दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

news

Leave a Comment