स्टोरी

ओरस येथे आयोजित “राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

ओरस: दिनांक ७ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर व यांच्या संयुक्त विद्यमाने सुरंगी हॉल जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे कोटपा २०२३ व एफसीटीसी ५. ३ अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा माननीय श्रीमती तृप्ती धोडभिसे मॅडम जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने व माननीय श्रीमती प्रतिभा वराळे उपजिल्हाधिकारी महसूल, मान डॉ. श्रीपाद पाटील जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, माननीय डॉ. अनंत दावंगे अधिष्ठता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग सोबत डॉ. सुबोध इंगळे निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली सदर कार्यशाळे करता मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक श्री आप्पासाहेब उगले यांनी कोटपा २००३ कायदा या विषयी त्या मध्ये कलम 4, कलम 6(अ), 6(ब), तसेच कलम 5,7,8 या कलमान्वये सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच एफसीटीसी 5.3( WHO Framework Convention on Tobacco Control) या बाबत जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वय समिती यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी रवी जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी तंबाखूजन्य बनला आहे याबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले.

त्यानंतर श्री कार्मीस आल्मेडा सामाजिक कार्यकर्ते यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व तंबाखूमुक्त शाळा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री संतोष खानविलकर यांनी उपस्थित झाला तंबाखू विरोधी शपथ देण्यात आले. सदर प्रशिक्षणाची सूत्रसंचालन सौ. अदिती कशेळीकर यांच्यावतीने करण्यात आले. सदर कार्यशाला यशस्वी करणेकरिता श्री संतोष कानविलकर- जिल्हा सल्लागार, एनटीसीपी श्री कार्मीस आल्मेडा – सामाजिक कार्यकर्ता, एनटीसीपी श्री अनिल गुंजे- विभागीय व्यवस्थापक मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजी नगर, श्री गणेश उगले व श्री योगेश उगले, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.


Spread the love

Related posts

वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांचा सत्कार!

news

एका दलम कमांडरसह तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश

news

कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाचे रविवारी २९ मार्च रोजी होणार प्रकाशन.

प्रसाद परब

Leave a Comment