स्टोरी

सावंतवाडी शहरातील रस्त्यांची दुरावस्था, समस्या व अडचणी संदर्भात नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची मान्सून आढावा बैठक संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात सध्या रस्ते खोदाईमुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी अशा विविध समस्या व अडचणीत संदर्भात तातडीची मान्सून आढावा बैठक नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत गॅस पाईपलाईन च्या कार्यप्रणाली बद्दल जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. येत्या पाच दिवसात शहरातील सर्व रस्ते सुरळीत करण्याचे आश्वासन रस्ता काम घेणाऱ्या ठेकेदारांनी या बैठकीत दिले. नगराध्यक्ष सौ. श्रध्दा लखम सावंत भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती, सुधीर आडीवरेकर नियोजन सभापती आनंद नेवगी, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, महिला बालकण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नीलम नाईक, सुनीता पेडणेकर, सुकन्या टोपले, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, दुलारी रांगणेकर, ॲड सायली दुभाषी, अजय गोंधवळे, देवेंद्र टेमकर, तौकीर शेख, नगरसेवक उपस्थित होते.

अधिकारी व कर्मचारी तसेच विविध कामांचे कंत्राटदार यांच्या उपस्थितीत शहरातील रस्ते, गटारे, नाले आरोग्य विषयक बाबींबाबत पावसाळा पूर्व नियोजनाच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये संबंधीत प्रभागाचे नगरसेवक यांनी प्रभागनिहाय मांडलेल्या समस्या जाणून घेवून शहरात गॅस पाईपलाईन (एमएनजीएल) तसेच पाणी पुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेले चर बुजविणे तसेच रिस्टोरेशनच्या कामासाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सदरची कामे येत्या पाच दिवसात पूर्ण करून देण्यात येतील. अशी ग्वाही संबंधीत ठेकेदार यांनी दिली. तसेच शहरातील ट्रॅफीक समस्या, विविध ठिकाणी झालेली अतिक्रमणे याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेने नेमलेल्या पथका मार्फत सव्र्व्हे करून संबंधीतांना नोटीस बजावणी करून सात दिवसात अहवाल सादर करण्यात येईल. अशी ग्वाही दिली.

तसेच एमएनजीएल च्या कामातील निष्काळजीपणाबाबत मा. जिल्हाधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार करण्यात येईल. असे सांगितले.उपस्थित संबंधीत अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदार यांनी कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत अशा सुचना नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी दिल्या. तसेच पावसाळा सुरू झालेला असल्याने शहरातील धोकादायक झाडे, स्ट्रीट लाईट समस्या, गटारात साचलेले पाणी, डास प्रतिबंधक फवारणी, मोकाट कुत्रे व इतर जनावरे यांचा बंदोबस्त करणे वगैरे कामे प्राधान्याने पार पाडावीत. अशा सुचना अधिकारी कर्मचारी यांना दिल्या.


Spread the love

Related posts

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद…! श्रीमंत लखम सावंत भोसले

news

समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्‍हल्‍सच्‍या बसच्‍याभीषण अपघाताला बसचालक शेख दानिश जबाबदार?

news

महेश इंगळेंचा स्विमिंग ग्रुपच्या वतीने सन्मान.

news

Leave a Comment