स्टोरी

वनविभाग कणकवली नियतक्षेत्र “जागतिक पर्यावरण दिन सप्ताह” उत्साहात संपन्न!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळ व सावंतवाडी वनविभाग यांचे संयुक्त विद्यमाने एक ते पाच जून हा कालावधीत “पर्यावरण दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात आला.उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. मिलिश शर्मा व सहायक वनसंरक्षक सावंतवाडी (खा.कु.तो.) डॉ.सुनील लाड व वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली श्री. सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कणकवली नियतक्षेत्र ” जागतिक पर्यावरण दिन सप्ताह” साजरा करण्यातआला. त्यानुसार १ जानेवारी रोजी घोणसरी नियत क्षेत्रात सर्व वन कर्मचारी यांनी निसर्ग भ्रमंती करून जंगलातील औषधी वनस्पती आणि जैवविविधता याबाबत प्रवीण सावंत यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त केले. २ जून रोजी केदारलिंग मंदिर करूळ या ठिकाणच्या देवराई परिसराची साफसफाई करून देवराई संवर्धनाचे जैवविविधतेतील महत्व विशद करण्यात आले. ३ जून रोजी देवगड मीठमुंबरी येथे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व कांदळवनांचे मानवाच्या जीवनातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ४ जून रोजी कुंभवडे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित ग्रामस्थांना जैव विविधतेबाबत मार्गदर्शन करून वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला.५ जून रोजी नरडवे मधील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी विविध स्थानिक वृक्षप्रजातींच्या रोपांची लागवड करून स्थानिक जैवविविधता संरक्षण व संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली श्री. सुहास पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदरचा सप्ताह वनपाल देवगड श्री .श्रीकृष्ण परीट,वनपाल फोंडा श्री.सारीक फकीर, वनपाल दिगवळे श्री .सदाशिव वागरे,वनपाल भिरवंडे श्रीम. कुसुम कांबळे, वनपाल वैभववाडी श्री.सुरेश पटकारे, पदाधिकारी सरपंच ग्रामस्थ आणि वनक्षेत्रातील सर्व वनरक्षक यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला.


Spread the love

Related posts

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद…! श्रीमंत लखम सावंत भोसले

news

मुंबईचे उप महापौर संजय घाडी यांचे रघुवीर वायंगणकर यांच्याकडुन अभिनंदन!..!

प्रसाद परब

जिल्हास्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत मिलाग्रीस मराठी प्रायमरीची कु. निधी विजय खडपकर प्रथम

news

Leave a Comment