
कुरुक्षेत्र: अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्य समितीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुरीकर यांच्या अध्यक्षतेखाली जाट धर्मशाळा सभागृह कुरुक्षेत्र (हरियाणा )येथे नऊ मे रोजी संपन्न झाली. उद्घाटन- सभेचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष श्री.बसवराज गुरीकर यांनी दिपप्रज्वलन करुन केले. व प्रास्ताविक हरियाणा राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तरूण सुहाग यांनी केले. स्वागत सत्कार-उपस्थित मान्यवर तसेच प्रत्येक राज्य प्रतिनिधी यांचा हरियाणा राज्य संघाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.


राष्ट्रीय कार्यकारणी सभेत अनेक महत्वपूर्ण बाबीसंबधी माहिती देण्यात आली.
१) टिईटी बाबत- टिईटी बाबत शिक्षक संघटना म्हणून फक्त अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने पहिली पुनर्विचार याचिका दाखल केली होती . ती स्विकारली असून येत्या १३ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात ओपन कोर्ट सुनावणी होत आहे. २०११ पुर्वी नियुक्त शिक्षकांना निश्चितच टिईटी तून सुटका मिळेल. पदोन्नती बाबत टिईटी सक्ती राहू शकते.परंतु त्याबाबत आपले वकील सक्षम पणे बाजू मांडतील .लवकरच शिक्षकांना टिईटी बाबत दिलासा मिळेल असा आशावाद राष्ट्रीय सरचिटणीस कमलाकांत त्रिपाठी यांनी व्यक्त केला.
२)आठवा वेतन आयोग- आठवा वेतन आयोगाची स्थापना करावी यासाठी गेली दोन वर्षे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आंदोलनाद्वारे मागणी करत होता.त्याला यश आले असून आठवा वेतन आयोग मा. न्यायमूर्ति रंजना प्रकाश देसाई माजी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वन नेशन वन पेन्शन, वन नेशन वन एज्युकेशन व वन नेशन सेम सँलरी या त्रिसूत्री ची मागणी शिक्षकांसाठी वेतन आयोगा कडे करणार आहे.पुढील आठवड्यात विस्तृत ड्राफ्ट वेतन आयोगाला सुपुर्द करण्यात येईल.
३) नवीन शैक्षणिक धोरणातील त्रुटी- स्कूल काँम्प्लेक्स संकल्पनला विरोध करण्यात येत असून गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी करणे आवश्यक आहे.यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू राहील.
४) राष्ट्रीय अधिवेशन- अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे ३०वे राष्ट्रीय अधिवेशन २०२७ मधे बेंगलोर येथे घेणेबाबत सभेत निर्णय घेण्यात आला.
या सभेसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य कार्याध्यक्ष मा. श्री. आण्णाजी आडे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री महादेव लक्ष्मण देसाई उपस्थित होते . सभेसाठी भारतातील २४ राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.
