मालवण: चौके नांदरुख परिसरात राहणारा चंद्रकांत यशवंत चव्हाण (वय ४० ) हा युवक नेहमीप्रमाणे दुचाकी एक्टिवा अॅक्टिवा MH07 AD1633 या गाडीने मेव्हण्या सोबत कामावरून घराच्या दिशेने येत असताना मालवण कसाल मार्गावर चौके येथे डंपरला MH – 07X 0666 ओव्हरटेक करत असताना अपघात होऊन डंपर खाली गेल्याने जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. सोबत असलेला मेव्हणा याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी चौके रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची खबर मिळतात चौके ग्रामस्थांनी अपघात स्थळ धाव घेतली. अपघातात मृत्युमुखी पावलेला चंद्रकांत याच्या पश्चात पत्नी, शिक्षण घेणाऱ्या दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि पुढील पंचनामाची कारवाई चालू केली. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.घटनास्थळी राजा गावडे, संतोष गावडे, बीजी गावडे, बंड्या गावडे, अजित गावडे, साई गावडे व अन्य ग्रामस्थांनी धाव घेतली.
