स्टोरी

सत्कोंडी येथे सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न..!

Spread the love

रत्नागिरी: शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सत्कोंडी येथे कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग व ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय निमंत्रित कवींचे काव्य संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी शुभम कदम, सौ. समृद्धी गोणबरे, ज्ञानेश्वर पाटील, वैशाली कोवळे, प्रगती शिर्के, राष्ट्रपाल सावंत, अरुण मोर्ये आदींनी आपल्या सर्वोत्तम कविता सादर केल्या. या काव्य मैफीलीस सत्कोंडीकरांनी व उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली..यावेळी दि मॉडेल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर हे मे महिन्यात सेवानिवृत होत आहेत. सत्कोंडी व कोळेकर सरांचे नेहमीच एक सौदार्य नाते अबाधित राहिले आहे.

शाळेच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न हे गौरवास्पद असल्याने त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक व पेन देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गेली सात वर्षे उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉ. श्रृती कदम यांचाही शाल, श्रीफळ, बुके, पुस्तक व पेन देवून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व निमंत्रित कवींना सहभागाचे प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह, पुस्तक व पेन देवून गौरव करण्यात आला.

नेटके नियोजन, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती पाहून अनेक कवींनी समाधान व्यक्त केले.यावेळी माजी प्राचार्य प्रकाश वंजोळे, श्री सुवेश चव्हाण सर, श्री नितीन बैकर, श्री नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य, श्री सुभाष पालये सर,सौ.वर्षा अशोक कदम आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.या सोहोळ्याचे स्वागत व प्रास्ताविक श्री संजय बैकर यांनी केले.आभार सरपंच सतिश थुळ यांनी केले.


Spread the love

Related posts

बंगलादेशच्या किनारपट्टीला मोचा’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

news

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मठ-कुडाळ पणदूर घोटगे रस्त्याचे भूमिपूजन…!

news

रामललाच्या आरतीला ‘ऑनलाईन’ उपस्थित रहाता येणार…!

news

Leave a Comment