स्टोरी

चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ही नरकासुर स्पर्धा ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, कोनशी, बावळाट, तांबोळी, असानिये, चराठा, कारीवडे, माजगाव या गावांसाठी मर्यादीत आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १०००२/- रूपये (श्री. बबलू गावकर पुरस्कृत), द्वितीय पारितोषिक: ५००२/- रुपये (श्री. उमेश गावकर पुरस्कृत), तृतीय पारितोषिक ३००२/- रुपये (श्री.महेश गावकर पुरस्कृत), तसेच उत्तेजनार्थ १००२ रुपयांची तीन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

इच्छुक स्पर्धकांनी शनिवार १८ ऑक्टोबरपर्यंत उदीत गावकर ९०७५५ ७४६५८ आणि प्रथमेश गावकर ७५८८८६३११० यांच्याकडे द्यावी असे आवाहन चौगुलेवाडी मित्रमंडळाचे बबलू गावकर आणि महेश गावकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

आपल्या व्यक्तिमत्व विकासात ‘स्व’ महत्वाचा घटक असतो….! प्रा. रुपेश पाटील

news

मसुरे मध्ये १८ एप्रिल रोजी प्रथमच महिला पुरुष यांच्या मध्ये २०-२० भजन डबलबारी

news

होळीच्या मुहूर्तावर कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री देव धावगिरा देवस्थान येथे नव्याने देवस्थानच्या नावाच्या फलकाचे अनावरण.

news

Leave a Comment