स्टोरी

बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही ! संजय शिरसाटांचा हल्लाबोल.

Spread the love

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ४८ जागा देणार असल्याचे वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाटांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर यांनी पलटवार केला आहे. बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, असं म्हणत संजय शिरसाटांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिउत्साहात ते वक्तव्य केलंय. अशी स्टेटमेंट दिल्यानं युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, असा सल्लाही संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना दिला आहे. ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? याची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो त्यांना जाहीर करू द्या. तुम्हाला अधिकार कोणी दिला. अशामुळे पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते, असंही ते म्हणालेत.खरं तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढणार असून, शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागा लढण्यासाठी नेतेच नाहीत, असे म्हणत शिंदे गटाला ४८ जागा देणार आहोत, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं. विशेष म्हणजे युतीतील जागावाटपाबाबत संयम न ठेवता वक्तव्य केल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगेच सारवासारव करावी लागली होती. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष असताना केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे भाजपची पंचाईत झाली होती, तशीच वेळ बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे यावेळी भाजपवर आली.


Spread the love

Related posts

आदर्शवत् राज्‍य आणि देश घडवण्‍यासाठी अध्‍यात्‍माविना तरणोपाय नाही ! – अक्षय महाराज भोसले छत्रपती

news

मुंबई शहराच्‍या प्रवेशद्वारांवरील पथकर नाके तातडीने बंद करा ! आमदार आदित्‍य ठाकरे

news

देवस्थान कर्मचारी सेवेकरांच्या वतीने महेश इंगळे यांचा सत्कार

news

Leave a Comment