स्टोरी

पदवीधर शिक्षक जयप्रकाश दत्ताराम पेडणेकर हे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर निवृत्त.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: विज्ञान प्रदर्शनात मॉडेल बनविण्यात हातखंडा असलेल्या जयप्रकाश पेडणेकर यांनी तंत्रस्नेही ज्ञान अल्पावधीत आत्मसात करून ते इतर शिक्षकांनाही दिले. तसेच आपल्या अखेरच्या काळात गंभीर आजारावर मात करून शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानदानाचे कार्य केले. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान असून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निष्ठावंत पाईक म्हणून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोदगार अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई यांनी काढले.

इन्सुली पागावाडी शाळा नं ५ चे पदवीधर शिक्षक जयप्रकाश दत्ताराम पेडणेकर हे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर निवृत्त झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या गौरव सोहळ्यात म ल देसाई बोलत होते. यावेळी व्यासपिठावर गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, आर. पी. डी. कॉलेजच्या उप प्राचार्या सुमेधा नाईक, विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर, शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकुर, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष विजय गावडे, सचिव महेश पालव, महिला अध्यक्ष तेजस्विता वेंगुर्लेकर, निवृत्त ग्रामविस्तार अधिकारी एस डी पेडणेकर, प्रसिद्ध वैद्य अंकुश कोंडुरकर, शिक्षक अरविंद मुननकर, राजन खोत, पद्माकर खोत, गणेश डिचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी जयप्रकाश पेडणेकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात सावंतवाडी तालुक्यात उत्तम तंत्रस्नेही म्हणून बजावलेली सेवा आदर्शवत असल्याचे सांगितले यावेळी प्रमोद पावसकर यांनी पेडणेकर यांचे आदर्शवत आणि अभिमान वाटावा असे शैक्षणिक कार्य असल्याचे सांगितले. लक्ष्मीदास ठाकूर यांनी शांत, संयमी व्यक्तीमत्व असलेल्या पेडणेकर यांच्या शब्द कोशात नाही हा शब्द नसल्याचे सांगून ऑनलाईन कामे करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे सांगितले. गणेश घाडी यांनी पेडणेकर यांच्या डी एड बॅचसह अनेक आठवणींना उजाळा दिला. भाऊ एस डी पेडणेकर यांनी मांगेली सारख्या दुर्गम भागासह प्रत्येक गावात पेडणेकर यांनी शिक्षणाचे कार्य उत्तम केल्याचे सांगितले. विजय गावडे यांनी आपल्यासह इतर शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यास पेडणेकर सरांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. आंबेगाव शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता मुननकर यांनी संयमी, अजातशत्रू असणाऱ्या जयप्रकाश पेडणेकर यांनी शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात आपला ठसा उमटवला असल्याचे सांगितले.

.यावेळी यावेळी पत्नी जयश्री पेडणेकर, सहकारी शिक्षक गोपाळ गवस, ओटवणे शाळा नं.१ चे निवृत्त मुख्याध्यापक अरुण होडावडेकर, राजन कोरगावकर, संतोष परब, राजन खोत संगिता खोत, गणेश डिचोलकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पेडणेकर यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो यासाठी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध संस्था आणि व्यक्ती यांच्यावतीने पेडणेकर त्यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी जयप्रकाश पेडणेकर यांनी मांगेली सारख्या दुर्गम भागात शुन्यातून विश्व निर्माण करताना शिक्षणाची ज्ञानगंगा आणण्याचे कार्य माझ्या हातून घडले. त्यानंतर सोनुर्ली, ओटवणे, इन्सुली या गावातील शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीपासून तसेच अखेरच्या काळात आजाराने त्रस्त असताना विविध मान्यवरांसह माझे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, संघटना, सर्व शिक्षक बंधु भगिनी यांची साथ मोलाची ठरली. त्यामुळेच आपण शैक्षणिक क्षेत्रात कार्य करू शकलो. यापुढेही सर्वांशी असलेले ऋणानुबंध कायम राहतील याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आजगाव डी. एड. १९८८-९० च्या बॅचने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता गवस, सुत्रसंचालन स्नेहा धोंड, सन्मान पत्राचे वाचन सृष्टी धुरी तर आभार सुर्यकांत सांगेलकर यांनी मानले.


Spread the love

Related posts

सावंतवाडी येथे साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

news

स्वामी भक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग! शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

news

वडाचापाट शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप!

news

Leave a Comment