स्टोरी

हिंदुजनजागृती समितीच्या वतीने आदर्श होळी उत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न! सनातनचे संत सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिति लाभली

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी : ६ मार्च , ( वार्ता ): – होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.

धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. कोकणात होळी हा सण प्रत्येक गावात शहरात साजरा केला जातो . सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गावामध्ये अपवाद वगळता सर्व ठिकाणी होळी मोठ्या उत्साहात साजरा झाला. हिंदूंचे धार्मिक सण – उत्सव आदर्श रीत्या कसे साजरे करावेत या विषयी हिंदूंना प्रभोधन व्हावे यासाठी सनातन संस्था आणि हिंदुजनजागृती समिती यांनी संयुक्त रित्या शहरात श्री देव नारायण मंदिर समोरील भागात होळीचे पूजन काण्यात आले. यावेळी माजगाव येथील धर्मप्रेमी अजित वारंग यांनी पूजन केले तर पुरोहित म्हणून श्रीपाद कशालिकर विधिवत पूजा केली .

यावेळी एकूण १०० हुन अधिक सनातनचे साधक, हिंदुजनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्माभिमानी हिंदु उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. राखी पंगाम यांनी केले.


Spread the love

Related posts

शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : कोकणातील ५ जिल्ह्यांच्या सागरीक्षेत्रात पालट !

news

माडखोल भाजपा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

news

पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेलं वाहन घ्या! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

news

Leave a Comment