स्टोरी

न्हावेली गावातील सोलर लाईटचे लोकापर्ण…!

Spread the love

न्हावेली गावातील ग्रामस्थांची व कार्यकर्त्यांची मागणी मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर आणि आरती माळकर यांनी केली पुर्ण.

सावंतवाडी प्रतिनिधी: न्हावेली गावात विकासाची गंगा मनसेच्या माध्यमातुन होत आहे.  लोकांच्या आग्रहास्तव मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर आणि आरती माळकर यांनी मनसे नेते राज्य सरचिटणीस संदिपजी दळवी यांच्या माध्यमातुन न्हावेली गावातील भटाचे टेंब येथे सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले. येथील लोकांना रात्री अंधारातून ये जा करतांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे काही दिवसांपूर्वी न्हावेली गावातील ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर आणि आरती माळकर यांच्याकडे सोलर लाईट ची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या सोलर लाईट मागणीनंतर काही दिवसातच गावात सोलर लाईट बसवण्यात आली आणि या सोलर लाईटचे लोकापर्ण मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मनविसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मनसे विभाग अध्यक्ष तथा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, न्हावेली ग्रामपंचायत सदस्य आरती माळकर, चेतन पार्सेकर, नवनाथ पार्सेकर, प्रथेमश नाईक, सत्यवान गावडे, अजय नाईक, समिर पार्सेकर, प्रसाद गावडे, दत्तप्रसाद पार्सेकर, राज धवन, अमोल पार्सेकर, दिपक बरकुटे, भूषण पार्सेकर, बंटी धवन, किशोर पार्सेकर, भावेश पार्सेकर, अजय पार्सेकर, धनेश नाईक, कुणाल पार्सेकर, ओमकार निर्गुण, बाळु सांवळ राकेश न्हावेलकर, दिपक पार्सेकर, मनसे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे गावातील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.


Spread the love

Related posts

देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान ; वादळाचा जास्त फटका मूळबांध वाडा गावाला.

news

आंगणेवाडी येथील सुलभ स्वच्छता ग्रहाला वीज पुरवठा करणारा वीज मीटरचा प्रवाह खंडित…!

news

गोळवण येथील विकास कामांचे भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन!

news

Leave a Comment