स्टोरी

रुजुल पाटणकर यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचा ‘शैक्षणिक शिल्पकार’ पुरस्कार प्रदान..!

Spread the love

सावंतवाडी: येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रूजुल पाटणकर यांना त्यांच्या क्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वतीने ‘शैक्षणिक शिल्पकार’ पुरस्कार सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सिताराम गावडे, सौ. संयुक्ता गावडे, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, डॉ. दत्तात्रय सावंत, श्रीमती स्वार, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, यशस्वी युवा उद्योजक सिद्धांत परब, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, माडखोलचे माजी सरपंच संजय लाड, चौकुळ गावाचे सामाजिक कार्यकर्ते व यशस्वी उद्योजक दिनेश गावडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्य संपादक सिताराम गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विशाल पित्रे यांनी केले.


Spread the love

Related posts

न्यू होरायझन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची तारांबळ; उन्हात-पावसात फुटपाथवर रांगा

प्रसाद परब

आई ‘च्या स्मृती दिनी महेश गायकवाड यांनी खरड -आदिवासी भागातील माता भगिनींना केले साड्या आणि अन्न धान्यांचे वाटप!

news

दर्पण प्रबोधिनीच्या वतीने २६ रोजी संविधान जागो अभियानांतर्गत व्याख्यान!

news

Leave a Comment