स्टोरी

रेड्याच्या हल्यात महिला गंभीर जखमी….! पारपोली गावातील घटना

Spread the love

सावंतवाडी: आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या पारपोली गावठाण येथील रश्मी रामकृष्ण गावकर (४५) हिच्यावर रेड्याने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याला हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
ही घटना सोमवारी सकाळी पारपोली गावठाणवाडी येथे रेड्याला शेतामध्ये चारायला नेतना घडली आहे.
रश्मी गावकर या नेहमी प्रमाणे आपल्या स्वत :च्या गोठ्यातील गुराना चरण्यासाठी सकाळी शेतात घेऊन जात असतानाच रेडा चांगलाच आक्रमक झाला आणि गावकर यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला एवढा जबरदस्त होता कि हल्यात तिच्या डोक्याला हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून जखमी अवस्थेत येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिच्यावर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले मात्र दुखापत मोठी असल्याने लागलीच तिला गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. रेड्याने अचानक कशासाठी हल्ला केला याचे कारण मात्र समजू शकले नाही.


Spread the love

Related posts

जुनी पेन्शन योजना १०० टक्के देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन…..

news

१७ हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येणार! मंत्री कु.आदिती तटकरे

news

मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ? पोलिसांना फोन,ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी.

news

Leave a Comment