स्टोरी

बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन!

Spread the love

 

मालवण: बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवण्यात आले. इंडिया प्रिटिंग वर्क्स मुंबई या मुद्रणालयाचे व इंकींग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेचे प्रमुख श्री आनंद लिमये यानी वाचकाना वितरीत करण्यासाठी दिलेल्या अंकांचे प्रदर्शन करण्यात आले.

सर्वच दिवाळी अंक दर्जेदार असून वाचकानी या दिवाळी अंकांचे वाचन करावे असे आवाहन किशोर शिरोडकर यानी केले. पुरुष स्पंदन, विजानधारा, धनंजय, कथाश्री, नवल मोहिनी, एबीपी माझा, अक्षरगंध या सारखे अनेक दर्जेदार अंक श्री आनंद लिमये यानी उपलब्ध करून दिले आहेत.वाचकाना या दिवाळी अंकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, सुजाता पावसकर, श्रीमती पोखरणकर, कुमारी वाईरकर, श्रीधर गोधळी, व वाचक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संदीप देसाई!

news

प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १२ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

वेंगुर्ला न.प.ने आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना दिले ‘विमा सुरक्षा कवच’ 

news

Leave a Comment