स्टोरी

आचरा येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांची निवड….

Spread the love

शहरप्रमुख पदी माणिक राणे, उप शहरप्रमुख पदी छोटू पांगे व भाऊ परब, युवासेना उप शहरप्रमुख पदी अक्षय पुजारे…..

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आचरा शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न….

 

सिंधुदुर्ग: शिवसेना पक्षाच्या आचरा शहरप्रमुख पदी माणिक राणे, उप शहरप्रमुख पदी छोटू पांगे,उप शहरप्रमुख पदी भाऊ परब, युवासेना उप शहरप्रमुख पदी अक्षय पुजारे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आचरा येथील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक आचरा येथे पार पडली. यावेळी शिवसेना संघटनावाढीबाबत चर्चा करण्यात आली.तसेच मतदारांचे आभार मानण्यात आले.आचरा ग्रा. प. निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्या अनुष्का गावकर व सदस्या पूर्वा तारी यांचे आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी चंदन पांगे, नितीन घाडी, भाऊ परब,उदय दुखंडे,चंद्रकांत गोलतकर, माजी सरपंच मंगेश टेमकर,सदांनद घाडी,शाम घाडी,अरविंद घाडी,सचिन परब, सचिन बागवे, विजयराज शेंडगे,अनिकेत मांजरेकर,आशु मयेकर,दिलीप कावले,प्रवीण मुणगेकर, संजय वायंगणकर,शेखर मुणगेकर, युगंधरा मोर्ज, प्रशांत गांवकर, प्रिया मेस्त्री,श्रद्धा सक्रू आदिंसह आचरा येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त मळा ते गोटेवाडी रस्त्याच्या जीवघेण्या रस्त्यामुळे गावकरी आक्रमक.

news

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी सावंतवाडी संस्थानकडून ७० गुंठे जागा विनामोबदला सुपूर्द..! श्री लखमराजे भोंसले.

प्रसाद परब

मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ? पोलिसांना फोन,ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी.

news

Leave a Comment