स्टोरी

मसुरे देऊळवाडा येथे १० रोजी गुरुद्वादशी निमित्त विविध कार्यक्रम!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

श्री समर्थ बागवे महाराज संस्थान मसुरे देऊळवाडा येथील दत्तमंदिरात १० नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ११ वा. दत्तात्रेयांच्या मूर्तीची विधियुक्त पूजा अर्चा व अभिषेक, दुपारी १२ वा. श्रींची महाआरती, १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळीं ७ ते ९ वा. स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ठीक ९:३० वा. दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळ, सिंधुदुर्ग यांचा “सहस्त्रनागबळी” हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविक रसिकांनी घ्यावा असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

अंतरिम अर्थसंकल्प २०२४ – रिअल इस्टेट क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या प्रमुख घोषणा पुढीलप्रमाणे आहेत…! बांधकाम व्यवसयिक नीरज देसाई.

news

जासई हायस्कूल मध्ये कर्मवीर जयंती व नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न.

news

वर्सोवा-विरार सी-लिंक’, ‘मेट्रो ११’ यांसाठी जपान साहाय्य करणार ! –उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

news

Leave a Comment