स्पोर्ट

मसुरेचा तनिष्क मुळीक राज्यस्तरावर ‘धावणार’!

Spread the love

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलचा आहे विध्यार्थी….

मसुरे प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सांगली द्वारा सांगली क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलचा मसुरे चांदेरवाडी येथील आठवितील विद्यार्थी तनिष्क महेश मुळीक याने घवघवीत यश मिळवत चंद्रपूर येथील राज्य स्तरिय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

तनिष्क याने विभागीय स्तरावर १४ वर्षाखालील मुले ४०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक आणि ६०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याला ताराचंद पाटकर, पालक महेश मुळीक, क्रीडा शिक्षक समीर गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था अध्यक्ष प्रकाश परब, स्कुल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, डॉ. अनिरुद्ध मेहंदळे, अशोक मसुरेकर, बाबाजी भोगले, मुख्याध्यापक किशोर देऊलकर आणि सर्व शिक्षक, संस्था पदाधिकारी यांनी तनिष्क चे अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

शारदा विद्यालय मळगाव रस्ता प्रशालेच्या गुणवंतांचा गौरव

news

पुणे शहर काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा सेलच्या वतीने इंटर दो जो कराटे स्पर्धा संपन्न.

news

तेजस्विनी आचरेकर यांची बेंगळुरू,कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर तायक्वॉंदो स्पर्धा करीता पंच म्हणून निवड.

news

Leave a Comment