क्राईम

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे एपीआय सागर खंडागळे आणि पीएसआय सुरज पाटील रायगड लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात…

Spread the love

सावंतवाडी: बिल्डर सिद्धांत परब यांच्याकडून लाच स्वीकारल्या प्रकरणी रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाने सावंतवाडीचा एपीआय सागर खंडागळे याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील दुसरा आरोपी व्हीआयपी दौऱ्यात असलेल्या पीएसआय सुरज पाटील यांच्या मागावर संबंधित पथक आहे. या प्रकरणी पीएसआय सुरज पाटील याला ही ताब्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड लाच लुचपतचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी दिली.

एपीआय सागर खंडागळे याला ताब्यात घेतांना रायगड लाच लुचपत विभाग पथकाचे अधिकारी

याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी पोलीस ठाण्यात फ्लॅट खरेदी प्रकरणात शहरातील बिल्डर सिद्धांत परब व अमित पास्ते अशा दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. मात्र याप्रकरणात श्री. परब यांना उच्च न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. तर पास्ते यांना अद्यापही अटक करण्यात आली नाही. तरीही या प्रकरणातून पास्ते यांना बाहेर काढू यासाठी सिद्धांत परब यांच्याकडे खडांगळे व पाटील यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात श्री. परब यांच्यासोबत सहाय्यक खंडागळे व पाटील यांची गुप्त जागी चारवेळा बैठक झाली होती. एकुणच याबाबत श्री. परब यांनी ठाणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ठाणे लाच लुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल लोखंडे यांनी कारवाई संदर्भात रायगड लाच लुचपत विभागाला आदेश दिले होते. त्याच्या आदेश व मार्गदर्शनानुसार रायगड लाच लुचपत विभागाचे पोलिस निरिक्षक रणजित गलांडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक विनोद जाधव, हवालदार महेश पाटील, कौस्तुभ मगर, विवेक खंडागळे, पोलीस नाईक सचिन आटपाटकर यांनी आज सावंतवाडीत येत सापळा रचला होता. तत्पूर्वी खंडागळे व पाटील यांनी मागितलेल्या दीड लाख रुपयांपैकी एक लाख रुपये रक्कम आज गुरुवारी देण्याचे सिद्धांत परब यांनी मान्य करुन संबंधित रक्कम सायंकाळी पोलिस ठाण्यात आणून देतो, असे सांगितले. त्यानुसार पाच वाजण्याच्या सुमारास परब हे खंडागळे यांना पोलिस ठाण्यातील त्याच्या केबीनमध्ये भेटले. व १ लाख रुपयांची रक्कम केबिन बाहेर दरवाज्याच्या बाजुला दिली. याच दरम्यान सापळा रचलेल्या रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्याच्यावर धाड टाकली.

पीएसआय सुरज पाटील

पोलिस ठाण्यात नेहमीचा कारभार सुरु असतातच अचानक धाड टाकल्याने सगळेच चक्रावून गेले. यावेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाला खंडागळे यांनी स्वीकारलेली १ लाख रुपयांची रक्कम रंगेहात सापडली. त्यानुसार खंडागळे याला तात्काळ ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देतांना रायगड लाच लुचपतचे पोलीस निरीक्षक श्री. गलांडे म्हणाले की, तक्रारदार श्री. परब यांनी ८ ऑक्टोंबर ला यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार गेले चार दिवस रडारवर होतो. या प्रकरणात उपनिरीक्षक सुरज पाटील यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय पाटील हे एका दौऱ्यात ड्युटीवर असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास सावंतवाडीत करुन पुढील तपास सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाकडे सोपविण्यात येणार आहे, असे सांगितले. दरम्यान सायंकाळी सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांच्या पथक पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. तर या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील खंडागळे यांना अटक करण्यात आली तर सुरज पाटील यांच्या मागावर पथक पाठवण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

(ब्रेकिंग न्यूज)! इसिस दहशतवाद्यांचे निपाणी कनेक्शन; आंबोलीच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी….

news

इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांचा वापर करून नक्‍कल केल्‍याप्रकरणी ४ गुन्‍हे नोंद! मुंबई येथे झालेल्‍या पोलीस शिपाई पदासाठीच्‍या भरतीच्‍या लेखी परीक्षेतील प्रकार!

news

वागदे येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

news

Leave a Comment