स्टोरी

श्री गणपती देवस्थान ट्रस्ट कोईळ कडून कोईळ शाळेला खुर्च्या भेट.

Spread the love

मालवण: श्री गणपती देवस्थान ट्रस्ट कोईळ, तालुका मालवण यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोईळ या शाळेला असलेली खुर्च्यांची गरज ओळखून त्यांनी दहा खुर्च्या शाळेस भेट दिल्या.

सदर प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. निलेश साटम, उपाध्यक्ष श्री. जयदेव साटम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. याप्रसंगी श्री.श्यामसुंदर साटम, श्री. अमोल साटम, नरेंद्र घाडी, पंढरी साटम, मनोहर साटम, गोविंद साटम, शांताराम कदम, सदाशिव साटम, राजाराम साटम, हर्षदा साटम, उर्मिला आठवले, श्रद्धा साटम, आरती साटम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. गणेश सुरवसे यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षाराणी सुरवसे यांनी आभार मानले.


Spread the love

Related posts

एकमुखी दत्तमंदिर सावंतवाडी येथे साजरा होणार श्रीटेंबे स्वामी पादुका मंदिरचा ११० वा वर्धापनदिन.

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित!

news

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे अदानी समुहाच्या ६ आस्थापनांचे ४५ सहस्र समभाग (शेअर्स)!

news

Leave a Comment