स्टोरी

मळगाव ग्रामपंचायतला केंद्रीय समितीची भेट !

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय कमिटीचे अधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती या खात्यातील संबंधित अधिकारी यांच्या पथकाने नुकतीच मळगाव ग्रामपंचायत व मळगाव गावात भेट देऊन संपूर्ण तपासणी केली व ग्रामपंचायत ने केलेल्या कामाचा या कमिटीने आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ. मयुरी बांदेकर यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. भारतीय संस्कृती प्रमाणे मळगाव ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर ग्रामपंचायत सदस्य सौ निकिता बुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचारती ओवाळली. तदनंतर ग्रामपंचायत सहभागृहामध्ये सरपंच सौ स्नेहल जामदार यांनी केंद्रीय समितीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकाऱ्यांचे स्वागत उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामपंचायत स्वच्छता अभियान अध्यक्ष गुरुनाथ गावकर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ, कामगार क्षेत्रातील कुशल व अकुशल कारागीर आरोग्य खात्यातील कर्मचारी बचत गटांच्या महिला, अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स सीआरपी उपस्थित होत्या.


Spread the love

Related posts

कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार.

news

मुस्लिम नदाफ कुटुंबियांची दुकाने बंद ठेवण्याचा भेडशी ग्रामपंचायतीचा ठराव रद्द..! न्यायालयाचे दुकाने उघडण्याचे आदेश.

news

कट्टा येथे भरले जुन्या नाणी नोटांचे भव्य प्रदर्शन….!

news

Leave a Comment