शिक्षण

मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापनेच्‍या संदर्भात समिती स्‍थापन !

Spread the love

१७ जुलै अमरावती वार्ता: अमरावती जिल्‍ह्यातील रिद्धपूर येथे प्रस्‍तावित मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापनेसंदर्भात साहित्‍य संस्‍कृती मंडळाचे अध्‍यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ६ सदस्‍यांची समिती स्‍थापन केली आहे. उच्‍च आणि तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय घोषित केला आहे. मराठी भाषेचे विद्यापीठ स्‍थापन व्‍हावे, यासाठी विविध संघटनांनी मागणी केली होती त्‍या पार्श्‍वभूमीवर उपमुख्‍यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापनेची घोषणा केली आहे. इतर राज्‍यातील भाषांसाठी स्‍थापन केलेल्‍या विद्यापिठांच्‍या कामगिरीचा अभ्‍यास करून मराठी भाषा विद्यापिठासाठी आवश्‍यक गोष्‍टी आणि येणार्‍या अडचणींवर उपाययोजना, तसेच विद्यापिठात शिकवले जाणारे अभ्‍यासक्रम हे राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणांशी सुसंगत करणे या संदर्भात तज्ञ व्‍यक्‍ती अन् संस्‍था यांच्‍याशी चर्चा करून अहवाल सादर करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.


Spread the love

Related posts

भरतगड इंग्लिश मिडीयम येथे महिला दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

news

आंतरराष्ट्रीय रंगोत्सव कला स्पर्धेत इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…!

news

कै. दत्ताभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

news

Leave a Comment