स्टोरी

शेतकरी चळवळीतील भीष्माचार्य हरपले..

Spread the love

१६ जुलै वार्ता: शेतकरी चळवळीत १९८० च्या दशकात शरद जोशी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी चळवळ गाजवली .त्या मधील प्रल्हाद दादा कराड यांच्या आकस्मित निधनाने संपूर्ण शेतकरी चळवळीचं मोठे नुकसान झालं आहे, अशा भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यक्त केल्या

या वर्षामध्ये माधव नाना मोरे, तुकाराम दादा निरगुडे व आता प्रल्हाद दादा कराड असे ऐकामागे – ऐक धक्के बसत आहे. चळवळीच्या दृष्टीने हे वर्ष अतिशय वाईट चालले आहे. चळवळीतले सगळे भीष्माचार्य एकामागोमाग जगाचा निरोप घेत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ व्यथित झाली आहे. असे दुःखद भावना व्यक केल्या.

संघर्षाचा विचार प्रल्हाद दादांनी आम्हाला शिकवला. स्वतःच्या घामाचा दाम शेतकऱ्याला ठरवण्याचा अधिकार द्या. यासाठी आयुष्यभर रस्त्यावर संघर्ष केला. पिंपळगावचे कांदा आंदोलन, खेरवाडीचे रेल रोको या आंदोलनांनी चळवळीच्या इतिहासामध्ये सुवर्णपान लिहिलं. या सर्व आंदोलनामध्ये शरद जोशी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून प्रल्हाद दादा रस्त्यावरती लढत होते. आज त्यांचे दुःखद निधन झाले असले तरी विचाराने ते आमच्यामध्ये जिवंत आहे. तरी सुद्धा चळवळीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या एका लढाऊ अभ्यासू, भीष्माचार्याला महाराष्ट्र मुकला आहे. ती पोकळी कधीही भरून निघणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने मी दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो, असे जगताप यांनी म्हटले आहे.


Spread the love

Related posts

दोषी नेत्यांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घाला ! न्यायमित्र विजय हंसरिया यांची सर्वोच्च न्यायालयात शिफारस

news

‘कोचिन शिपयार्ड’मध्ये बांधण्यात आलेल्या ३ युद्धनौकांचे जलावतरण….!

news

इस्रायलवरील आक्रमणातून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलणे आवश्यक ! ब्रिगेडियर हेमंत महाजन

news

Leave a Comment