Uncategorizedजागतिक घडामोडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान: ‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ लीजन ऑफ ऑनर’ मिळवणारे पहिले भारतीय

Spread the love

१५ जुलै वार्ता: फ्रान्स दौऱयाच्या दुसऱया दिवशी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यानंतर दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. हिंदुस्थानी नौदलांसाठी 23 राफेल लढाऊ विमाने आणि 3 पाणबुडय़ा फ्रान्सकडून खरेदी करणार आहे. याविषयी पत्रकार परिषदेत थेट घोषणा करण्यात आली नाही. पंतप्रधान मोदी यांना फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी भोजनासाठी निमंत्रण दिले होते. याचवेळी मोदी यांना ‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले हिंदुस्थानी आहेत.फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पॅरिसच्या आकाशात झेपावलेल्या तीन हिंदुस्थानी राफेल विमानांपैकी एका विमानाचे सारथ्य परभणीतील मराठमोळ्या वैमानिकाने केले होते. 34 वर्षांच्या स्क्वाड्रन लिडर सुशील शिंदे यांनी केलेले हे उड्डाण टीव्हीवर पाहताना महाराष्ट्रात, पूर्णा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे वडील शंकर शिंदे यांची मान अभिमानाने उंचावली. सुशील यांची बहीण देखील हवाई दलात अधिकारी आहे.


Spread the love

Related posts

मसिआच्या माध्यमातून कोकणातील प्रश्र्नांचा पाठपुरावा करणार.! – उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांचे प्रतिपादन. 

news

तर जीभ हसडून टाकू… एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!..

news

मराठी सिनेसृष्टीतील “फौजदार” हरपला; रविंद्र महाजनी यांचे निधन

news

Leave a Comment