स्टोरी

१५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया वापरासाठी पालकांची परवानगी आवश्यक!

Spread the love

३० जून वार्ता: १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया वापरासाठी पालकांची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे. फ्रान्स सरकारने गुरूवारी याबाबतचा कायदा मंजूर केला. लहान मुलं सायबर अत्याचाराला बळी पडू नयेत यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. फ्रान्सचे डिजिटल ट्रान्झिशन मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी याबाबत माहिती दिली. यासोबतच, हा कायदा शक्य तितक्या लवकर लागू करण्यात यावा असे निर्देश त्यांनी फ्रान्सच्या संसद सदस्यांना दिले आहेत. फ्रान्समधील सध्याचा सोशल मीडियाबाबतचा कायदा केवळ वैयक्तिक डेटाच्या वापरासंबंधी आहे. मात्र, सायबरस्टॉकिंग, सायबर बुलिंग, अनअटेनेबल ब्युटी स्टँडर्ड्स, पॉर्नोग्राफी, सोशल मीडियाचे व्यसन अशा बऱ्याच गोष्टी लहान मुलांसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे, यासाठी आणखी कडक कायदा आवश्यक असल्याचं मत फ्रान्समधील खासदारांनी व्यक्त केलं होतं.


Spread the love

Related posts

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वाटद कवठेवाडी शाळेचे माधव अंकलगे यांना प्रदान.

news

श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेल्या रासायनिक लेपनास मंदिर महासंघ, वारकरी यांचा तीव्र विरोध.

news

मसुरे या नावासाठी नवतरुण मित्र मंडळ चांदेर यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार.

news

Leave a Comment